संपूर्ण भारतात 26/11 हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
भारत देशाने 26.11.1949 रोजी संविधान स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी ही 26.01.1950 पासून संपूर्ण देशात करण्यात आली.
26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबई येथील इंदू मिल्स कमाऊंड्स मधील आंबेडकर स्मारकाचा शिलान्यास करतांना मा श्री नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाची घोषणा केली होती.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बोरगाव ग्राम पंचायत कार्यालयात ग्रामस्थांना संविधान वाचून दाखविण्यात आले.
यावेळी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, ग्रा.पं. सदस्य तानकू भिल, सोसायटी चेअरमन खंडू राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, आनंदसिंग रणसिंग राजपूत, श्रावण ओंकार पाटील, संजीव सजन पाटील, ग्रामसेवक पी बी सोनवणे, ग्राम पंचायत कर्मचारी धुडकू भिल व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news



