माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल भाजपा तर्फे विधान परिषदेवर बिनविरोध, जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार





 शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे धुळे व नंदुरबार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या हस्ते शुक्रवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी रात्री 7.15 वाजता प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या सह धुळे जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जि. प. सदस्य देवेंद्र पाटील, श्यामकांत ईशी उपस्थित होते.



माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे शिरपूर तालुक्यातून विधानसभेवर सलग चार वेळेस त्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा विधानपरिषदेवर पोटनिवडणूक सह सलग चौथ्यांदा असे आता सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने