तालुक्यातील गांजा शेती वर शिरपूर तालुका पोलिसांची पुन्हा कारवाई सात लाख वीस हजार रुपयांचा गांजा सदृश्य पदार्थ जप्त




शिरपूर प्रतिनिधी  - तालुका सध्या गांजा लागवडीमुळे महाराष्ट्रात राज्यात प्रकाश झोतात असून तालुक्यातील गांजा शेती व वारंवार पोलिसांच्या कारवाया समोर येत आहे काल देखील मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी गांजा शेती वर कारवाई करून मुद्देमाल हस्तगत केला आहे



दिनांक २०/११/२०२९ रोजी दुपारी १३.३० वाजेच्या सुमारास शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमीदारा मार्फत अशी माहिती प्राप्त झाली की, शिरपुर तालुका पोलीस स्टेशन हददीतील लाकडया हनुमान गावाच्या शिवारात इसम नामे प्रदीप वेस्ता पावरा रा. लाकडया हनुमान हा कसत असलेल्या वनजमीन क्षेत्रात गांज्या सदृश्य अंमली पदार्थ्याच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केलेली आहे सदर प्राप्त गुप्त माहितीच्या अनुशंगाने स.पो.नि./शिरसाठ यांनी शिरपुर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करून धुळे आर.सी.बी. पथकाची मदत घेवून नमुद बातमी चे ठिकाणी छापा टाकला असता आरोपी कसत असलेल्या वन जमीन क्षेत्रात खालील नमुद गांजा मिळुन आला असुन आरोपी हा फरार आहे.



१)७२०,००० /- रुपये कि चा एकुण ३६० किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमंली पदार्थाचे वनस्पतीचे हिरवे ओले ताजे झाडे, पाने व फांदया असलेले मुळांसह, मुळा पासुन ते शेंडया पर्यंत उंची अंदाजे ३ ते ५ फुटापर्यंत कमी अधिक उंचीचे असलेले प्रती किलो २००० रुपये कि.अ. एकुण- ७२०,००० /- रुपये ( सात लाख विस हजार मात्र) मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री प्रवीणकुमार पाटील सो. धुळे, मा. अपर पोलीस अधिक्षक मा. श्री प्रशांत बच्छाव सो. धुळे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री ईश्वर कातकाडे सो. शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली सपोनि शिरसाठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सावन पाटील मोटार वाहन निरीक्षक, सीमा तपासणी नाका हाडाखेड ता. शिरपुर राजपत्रीत अधिकारी, पोसई खैरनार, असई नियाज, असई गवळी, पोहेकॉ/238 ठाकुर पोहेकॉ./गंगाराम सोनवणे, पोहेकॉ 759 मंगेश मोरे, पोहेकॉ सईद शेख, पोना 1004 आरीफ पठाण, पोकॉ/मुकेश पावरा, पोकॉ 161 प्रकाश भिल, पोकॉ1677 मोरे व चालक पोकॉ/मनोज पाटील व RCB पथक धुळे चे 10 कर्मचारी यांनी केली असुन पोहेकॉ 1204 जाकीर शेख यांचे फियार्द वरुन गुन्हा दाखल झाला असुन तपास पोसई / भिकाजीगटील हे करीत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने