मध्यप्रदेशातून अवैध दारू ची वाहतूक करणा-यावर शिरपुर तालुका पोलीसांची कारवाई



शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील तालुका पोलिसांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली असता मध्यप्रदेशातून अवैद्य दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि श्री सुरेश शिरसाठ यांना दिनांक 15/11/2021 रोजी रात्री गुप्त बातमीदार कडुन माहीती प्राप्त झाली की सेंधवा कडुन शिरपुर कडे मॅक्स कंपनीची गाडी नं. एम. एच22- एम 481 यात दारुची चोरटी वाहतूक होत आहे. या बातमी वरुन शिरपुर तालुका पोलीसांनी रात्री 02.15 पलासनेर गांवाचे शिवारात मुंबई आग्रा रोडवर चारणपाडया जवळील गतिरोधक जवळ मॅक्स गाडी नं. एम.एच-22-एम 481 हीस थांबवुन तपासणी केली असता त्यात गोवा व्हिस्की, लेमाड व्हिस्की, बियर चे खोके मिळुन आले. इसम नामे सनी संजय कलाल रा. वरवाडे शिवार शिरपुर हा बियर चे टिन, लेमाँड व्हिसकी, गोवा व्हिस्कीची चोरटी विक्री करण्याचे उददेशाने कब्ज्यात बाळगुन चोरटी वाहतुक करतांना मिळुन आला आहे. त्याच्या कडून 
 1) 1,38,000/- रुपये किमंतीचे लेमाँड कंपनीचे स्ट्राँग बियर चे 50 खोके,

2) 62400/- कि. ची रॉयल सिलेट व्हिस्की चे 10 बॉक्स

3) 25200/- कि. ची गोवा व्हिस्की चे 4 बॉक्स

4) 2,50,000/- महेंद्र मॅक्स कंपनीची गाडी नं. एम.एच22- एम 481

असा एकुण 4,75,600/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री प्रवीणकुमार पाटील सो. धुळे मा. अपर पोलीस अधिक्षक मा. श्री प्रशांत बच्छाव सो. धुळे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री माने सो. शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली सपोनि शिरसाठ पोसई खैरनार, असई नियात शेख, पोहेकॉ पवन गवळी, पोकॉ मुकेश पावरा, पोना रोहीदास पावरा चालक पोहेकॉ सईद शेख, यांचे पथकाने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास असई बाविस्कर हे करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने