तरंगवाडीत नाभिक समाजातील कुटुंबियांना व्यवसाय उपयोगी साहित्याचे वाटप
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष एके काळचे नामवंत पैलवान शिवराज गावडे यांच्या वतीने गावातील नाभिक समाजातील पाच कुटुंबियांना व्यवसाय उपयोगी साहित्याचे वाटप आज दि. ११ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आले.
तरंगवाडी चे तंटामुक्ती अध्यक्ष शिवराज गावडे यांनी कोरोना कालावधीत नाभिक समाजाचा व्यवसाय मागील दीड वर्षापासून अडचणीत आला होता. कोरोना अटोक्यात येऊन अवघे काही महिने उलटून गेले तरीही व्यवसायातील मंदी संपली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कारागीरांना नव्याने साहित्य खरेदी करता येत नव्हती ही बाब लक्षात घेऊन नाभिक समाजातील कुटुंबियांना साहित्य वाटप करण्याचा निश्चय तंटामुक्ती अध्यक्ष शिवराज गावडे यांनी केला. आज दि. ११ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आले.
यावेळी तरंगवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डाॅ. शशिकांत तरंगे, माजी उपसरपंच तुकाराम करे, अजिनाथ तरंगे, ग्रामपंचायत सदस्य कांतिलाल तरंगे, सुहास बुटे, शिवाजी हेगडे, संतोष जाधव, अण्णा तरंगे, दीपक डोंबाळे, भारत तरंगे, पोलीस पाटील दादा माने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते
Tags
news
