शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहादा रस्ता हा खड्ड्यांच्या बाबतीत नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी व रस्ता दुरुस्तीसाठी नेहमीच निवेदन व मागणी केली जात असते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असून तात्पुरत्या रस्त्याच्या डागडुजी कामात देखील भ्रष्टाचार होत असल्याने सदरची कामे नेहमीच निकृष्ट होत असतात त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्याची दुरवस्था वाढत चालले आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आता सार्वजनिक श्रमदानातून करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शिरपूर वाघाडी रस्त्यावरील राज सागर हॉटेल जवळील प्राणघातक खड्डे बुजण्याचे काम भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष आबासाहेब राहुलजी रंधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातून पूर्ण केले. शिरपूर शहादा रस्त्यावर अतिशय जीवघेणे खड्डे असतांना त्याकडे शासनाचे कुठलेही लक्ष नसतांना, वाहन चालकांची व प्रवाशांची गाडी चालवताना संघर्ष करावा लागतो हे लक्षात येताच तालुक्याचे युवा नेते आबासाहेब राहुल रंधे व त्यांचे सहकारी मित्र मंडळांनी स्वतः कंबर कसून श्रमदानातू पेव्हर ब्लॉक व खडी टाकून खड्डे बुजण्याचे काम केले आहे.
यावर लोकांनी व वाहन चालकांनी देखील सर्वांचे कौतुक केले. यावेळी राजसागर हॉटेल चे संचालक योगेश पाटील, हेमराज पाटील, निलेश महाजन, प्रमोद पाटील, गजू पाटील, बबन पाटील, भूषण पाटील, दिनेश धनगर, पंकज चव्हाण, विशाल तिरमले, राजू, वकील गोसावी, भुरा पाटील आदींनी श्रम घेतले.
Tags
news



