कोण होणार करोडपती" TV गेम शो सहभाग संपूर्ण मार्गदर्शन मा. सिद्धांत कोंडूसकर (KBC मराठी स्पर्धक)
आजकाल अनेक TV चॅनल्स वर अनेक रियालिटी गेम शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि प्रत्येकच रियालिटी शो प्रेक्षकांच्या मनाला भावतो. या कार्यक्रमात आपणही भाग घ्यावा, या कार्यक्रमाची पूर्वतयारी करावी असे प्रत्येकालाच वाटते.
मग हीच मानसिकता ओळखून डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी ,मुंबई यांनी ' *कोण होणार करोडपती* ' गेम शोमध्ये सहभाग ,संपूर्ण मार्गदर्शन या कार्यक्रमात मा. सिद्धांत कोंडुसकर यांची मुलाखत घेण्यात आली.
या कार्यक्रमात गेम शो तयारी कशी करायची? कोणकोणत्या पात्रता फेऱ्या होतात? कोणत्या पुस्तकांचे वाचन करायचे ?वर्तमानपत्रातील चालू घडामोडी कशा महत्त्वाच्या असतात?जाहिरातींचे क्षेत्र कसे कार्य करते? Bachelor of Mass Media (B.M.M.) या आणि अशा महत्त्वाच्या पैलूवर सिद्धांत सरांनी सखोल मार्गदर्शन केले.
सोहम अकादमीच्या संकल्पक असणाऱ्या डॉ. मीनल मॅडमचा सिद्धांत हा माजी विद्यार्थी. या मुलाखतीच्या निमित्ताने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला व त्याने देखील हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सोहम अकादमीचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीम. समीक्षा तावडे यांनी केले तर परिचय आभार प्रदर्शन व आगामी आकर्षण श्रीम. प्रिया उपासनी यांनी केले तर तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या व रियालिटी शो संदर्भातल्या अनेक शंकांचे निरसन या कार्यक्रमामुळे झाले. म्हणूनच अकादमीला शुभेच्छा देऊन सर्वांनी कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेतला. एक माहितीपूर्ण कार्यक्रम असे वर्णन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
