अभिजित वाघचौरेस CET 2021 मध्ये ९९.७०६ गुण मिळवून यश




 सात्रळ /प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील 
अभिजीत संपत वाघचौरे (सध्या नाशिक येथे असून) आर.वाय.के.आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नाशिक नामांकित कॉलेजमधून बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा CET 2021  PCM या ग्रुप मधून. 99 .706 टक्के  मार्क मिळवून उत्कृष्ट नावीन्यपूर्ण  यश संपादन केले.
  त्यांच्या यशाचा वाट्या मध्ये त्याच्या आर वाय के कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक ,आई शुभांगी वाघचौरे ,वडील संपत वाघचौरे, भाऊ संकेत, मा.सुभाष शेजुळ काका (पीटीआय मुंबई), तसेच 
 प्रवरा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन. मा.विश्वासराव कडु पा.यांनी हि सत्कार करून अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
  स्पेक्ट्रम क्लास इन्स्टिट्यूटचे संचालक मा.कपिल जैन सर्व प्राध्यापक यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यामुळेच अशा प्रकारचे यश संपादन करू शकलो पुढे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सर्वोच्चस्थान मिळवून भारतीय प्रशासकीय प्रशासकीय सेवेमध्ये करियर करण्याचे मनोगत अभिजीत यांनी व्यक्त केले.
 त्यांचे वेगवेगळ्या स्तरावर तसेच गावातील मान्यवराकडुन सत्कार करून कौतुक होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने