दोडाईचा येथे पंचवटी चौकात निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ हितेंद्र देशमुख यांनी राबिवला लसीकरणाचा उपक्रम दोंडाईचा (अख्तर शाह.)




दोंडाईचा (अख्तर शाह.) 

दोंडाईचा - आज २४आक्टोबर रोजी पंचवटी चौकात कोविशील्ड एक दोन लसीकरणाचा उपक्रम निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र देशमुख यांनी आयोजित केला होता. रात्री ८ ते ११ दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे शहरवासीयाकडून कौतुक होत आहे.
कार्यक्रमास करनी सेनेचे महामंत्री राजू देशमुख,जाबाज    नगरसेवक करणसिग दादा देशमुख  डॉ.हितेंद्र देशमुख,
नितिन पाटील, श्रीमती खंडारे, जयपाल पाटील,टिंकू बागल, यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी कैलास दिक्षित, पप्पू देशमुख, युवराज देशमुख, सुरेंद्र देशमुख, पिंटू महाजन, कैलास महाजन,लखन चौधरी,पवन अग्रवाल, हितेंद्र राजपूत, प्रमोद महाजन,रत्नपाल राजपूत, प्रमोद अग्रवाल, ईश्वर अग्रवाल, मयुर परदेशी आणि प्रभागातील पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.
 पुष्पक पाटील, गणेश चकणे, शैलेश सोनार  आदी उपस्थित होते.यावेळी जवळ जवळ ३०० लोकांना लसीकरण करण्यात आले.लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता  पुन्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे   कोरोना काळात शिंदखेडा तालुका प्रभारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. पालकमंत्री जिल्हाधिकारी महोदय यांच्या कडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अपंग, विकलांग आणि मजूर वर्गांसाठी ज्यांना रोजंदारीवर काम असल्याने दिवसा लसीकरण करून घेणे शक्य नाही  त्यांनी नोंदणी केली तर त्यांना घरपोच लसीकरण करण्याचे देखील डॉ. हितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने