लातूर - 24-08-2021रोजी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक आयोजित केले होते . या बैठकीत महिला चा जाहीर पक्ष प्रवेश व निवडी करण्यात आले. महिला शहर संपर्क प्रमुख पदी किरणताई गुप्ता , तर महिला युवती अध्यक्ष पदी प्रेरणा वडजे यांची निवड करण्यात आले. निवडी चे पत्र महिला अध्यक्ष - कांचन भोसगे , तालुका कार्याध्यक्ष - शकुंतला रोडेवाड , तालुका उपाध्यक्ष - विजयमाला पवार , तालुका चिटणीस - विजयममाला मठपती , तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, युवक अध्यक्ष अमित कंठे , तालुका कार्याध्यक्ष - महादेव आपटे , तालुका उपाध्यक्ष - महादेव मोतीपावळे ,शहर संपर्क प्रमुख -चंद्रकांत भोसगे , शहर सह - सचिव - बालाजी बिरादार ,तालुका सचिव - अविनाश शिंदे , तालुका सरचिटणीस - सुदर्शन सूर्यवंशी , सह - संपर्क प्रमुख - सुनील केंद्रे , शहर कार्याध्यक्ष - गणेश दावणे , शहर चिटणीस - प्रशांत आडे , प्रहर सेवक - आयुब शेख , शहर सहसंपर्क प्रमुख , संजय महापुरे , प्रसिद्धी प्रमुख - अभय कुलकर्णी ,सर्कल प्रमुख विलास बंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले . व जिल्हा उपाध्यक्ष व सर्व सेल चे तालुका अध्यक्ष यांनी पदाधिकारी ना उदगीर नगरपालिका प्रहार स्वबळावर लढणार आहे तयारी ला लागा असे सांगितले .
प्रहार जनशक्ती पार्टी चे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू , प्रदेशाध्यक्ष - अनिलजी गावंडे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष - बल्लूभाऊ जवंनजाळ, महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले , जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे , यांच्या आदेशानुसार
नुकतीच जवळ आलेली निवडणूक म्हणजे नगरपालिकेची निवडणूक होय. मागील टर्म ला जनतेतुन नगराध्यक्ष पदाची निवड करण्यात आले .ज्या-ज्या वार्डातुन नगरसेवक निवडून आले पण उदगीर शहरातील मोजकी वार्ड सोडता विकास कामे झालेली दिसून येत नाहीत .भारतात लोकशाही असताना नागरिक असंख्य अडचणी चा सामना करून जगत आहेत .विकास कामासाठी लाखो करोडो रुपये निधी येऊन सुद्धा विकास कामे हवे तसे झालेले दिसून येत नाहीत . सामान्य नागरिकांना रस्ते , पाणी , लाईट, या मूलभूत गरजा महत्वाचा असतात. या सुध्दा गरजा पूर्ण झालेल्या दिसून येत नाहीत , असंख्य ठिकाणी नाल्या तुंबल्या , रस्तावर घाण पाणी , स्वच्छतेकडे दुर्लक्ष ,अनेक आजारांना आमंत्रण अशा या घटकांना नागरिक त्रस्त झालेले आहेत . कोणत्याही पक्षाचे नगरसेवक निवडून दिले तरी जैसे थे असे दिसून येत असल्याने सामान्याचा पक्ष प्रहार मागील 20 वर्षांपासून सामाजिक कामे करत आलेली आहे .महाराष्ट्रात अनेक नगरपालिका मध्ये नगराध्यक्ष , नगरसेवक ,निवडून आलेले आहेत . त्या ठिकाणी नागरिकांना इतर पक्षातल्या माणसाचा आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामाचा आढावा लक्षात येत असल्याने लोकांकडून नगरपालिकेत सुद्धा प्रहार ने उडी घ्यावी म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने नगरपालिका निवडणूका उदगीर मध्ये पूर्ण ताकतीने स्वबळावर लढवणार आहोत असे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजा चौगुले व जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या आदेशानुसार व उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे ,उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष सुर्यभान चिखले, महिला ता.अध्यक्ष कांचन भोसगे ,शहर अध्यक्ष रियाज शेख,कार्याध्यक्ष महादेव आपटे .युवक अध्यक्ष अमित कंठे ता.उपाध्यक्ष संदीप पवार सचिव अविनाश शिंदे यांनी बैठकीत जाहीर केले ...
