नवरात्र उत्सव मंडळांना इंदापूर पोलिसांकडुन नियमावली जाहीर प्रतिनिधी दत्ता पारेकर



 
प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:नवरात्रोत्सव हा दोन दिवसावर आला असून संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सव हा आनंदित व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर शहर व ग्रामीण पोलीस विभागाने काही सूचना नवरात्र उत्सव मंडळांना दिल्या आहेत.

सूचना पुढील प्रमाणे - 

1.नवरात्र मंडळ यांनी संबंधित सर्व विभागाच्या परवानगी घेणे बंधनकारक आहे. 2.नवरात्र मंडळ हे रजिस्टर नसल्यास ते धर्मादाय आयुक्त यांच्याकडून रजिस्टर करण्यात यावे. 3.नवरात्र मंडळाचे मंडप टाकताना  त्यासंबंधी ग्रामपंचायत नगरपरिषद व इतर विभागाचे परवानगी घेण्यात यावी. 4. मंडप टाकताना मूर्तीचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करावे मूर्तीस इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मंडप हा मजबूत असावा. 5. देखावे करताना लायटिंग मुळे शॉर्टसर्किट होणार नाही याची दक्षता घ्यावी. 6. आरती धूप अगरबत्ती पासून सजावट इस धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. 7. मंडपाचे आत मध्ये तसेच बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे विद्युत पुरवठा हा अनधिकृत घेऊ नये. 8. देवीची प्रतिष्ठापना वेळेत करावी. 9.नवरात्र मूर्तीचे संरक्षणासाठी 24 तास किमान दोन स्वयंसेवक नेमावेत. 10. करोना च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी पारित केलेले नियम व अटी शर्ती या सर्व मंडळांवर बंधनकारक राहतील. 11.  करोना अनुषंगाने मंदिरा मध्ये तसेच मंडळांच्या ठिकाणी कोणत्या ही प्रकारची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 12. नवरात्र उत्सव काळात मंगलमय वातावरण ठेवावे. 13. देवीच्या गळ्यातील हार नैवेद्य वगैरे खाण्यासाठी गाई शेळ्या कुत्री वगैरे प्राणी येतात त्यांच्यापासून देवीचे मूर्तीला धोका होणार नाही याची दक्षता घेणे. 14.लहान मुले विद्यार्थी वृद्ध लोक तसेच रुग्ण यांना आवाजामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घेणे. 15. कोणत्याही वाद्य मुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. 16. मंडपात फायर एक्सटीशुगर ठेवणे किंवा पाण्याच्या वाळूच्या बकेट से ठेवाव्यात. 17. मंडळातील स्वयंसेवक हे ओळखू येण्यासाठी टी शर्ट किंवा टोपी द्यावी तसेच ओळखपत्र देण्यात यावे. 18.माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. 19.वेळोवेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे विसर्जन वेळेत संपवावे.

अति महत्त्वाच्या सूचना - 

1. नवरात्रात देवीच्या अलंकार तसेच इतर मौल्यवान वस्तू साठी खास व्यवस्था असावी

2. गाभारा अथवा मंडपात प्रकाश व्यवस्था असावी

3. सी सी टिव्ही ची व्यवस्था असावी

4. मंडपात अथवा गाभाऱ्यात कायम कमीत कमी 2 स्वयंसेवक असावेत

5. मौल्यवान वस्तू तसेच अलंकारा साठी स्वतंत्र लॉकर ची व्यवस्था असावी

6. मौल्यवान वस्तू अगर अलंकार असतील तर ते रात्री चे सुरक्षित लॉकर मध्ये ठेवावेत

7. मौल्यवान वस्तू अगर अलंकार असणाऱ्या मंडळांनी तसे पोलिसांना आगाऊ माहिती द्यावी

8. नवरात्र काळात मंडळांचे कडून कोणताही वरील बाबतीत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने