शिरपूर तालुका पंचायत समिती पोटनिवडणूक चा निकाल पहा सविस्तर पंचायत समिती पोटनिवडणुकीत शिरपूर तालुक्यात भाजपने मारली बाजी




शिरपूर प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणूक निवडणूका नुकत्याच पार पडले असून आज त्यांचा निकाल जाहीर झाला आहे

शिरपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणांसाठी काल दि. 5 ऑक्टोबर रोजी 57.12 टक्के मतदान झाले होते.  6 ऑक्टोबर बुधवार रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी शांततेत पार पडली.


विखरण बु. (सर्वसाधारण) : या गटात विनिता मोहन पाटील (भारतीय जनता पक्ष) यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.


करवंद (सर्वसाधारण) : यतीश सुनिल सोनवणे (भाजप) हे बिनविरोध निवडून आले.


अर्थे खुर्द (सर्वसाधारण स्त्री) : संगीता शशिकांत पाटील (भारतीय जनता पक्ष) ३१५१ मते मिळवून १३११ मतांनी विजयी झाले. विरोधात अश्विनी सुधीर चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना १८४० मते तर सुरेखा सुनिल पाटील (अपक्ष) ५९३) मते मिळाली.


तर्‍हाडी त.त. (सर्वसाधारण स्त्री) : प्रतिभा कैलास भामरे (भाजप) यांनी २६५१ मते मिळवून १९३ मतांनी विजय प्राप्त केला. कल्पना विलास भामरे (राष्ट्रवादी) याांना २४५८ मते मिळाली


वनावल (सर्वसाधारण) : ममता ईश्वर चौधरी (भाजप) यांना ३६९१ मते मिळवून २१९१ मतांनी विजय मिळविला. विरोधात चेतन हरी चित्ते (अपक्ष) ३४६ मते, कांतीलाल परशराम धनगर (रा.काँ.) १५०० मते.


जातोडा (सर्वसाधारण स्त्री) : विठाबाई निंबा पाटील (भाजप) यांनी ३५९१ मते मिळवून २२२८ मतांनी विजय पटकावला. विरोधात सुवर्णा जयेश पाटील (काँग्रेस) १३६३ मते.


शिंगावे (सर्वसाधारण) : चंद्रकांत दामोदर पाटील (भाजप) यांनी ३७७२ मते मिळवून ८८५ मतांनी विजय प्राप्त केला. विरोधात रमाकांत आनंदराव पाटील (रा.काँ.) २८८७ मतेे.


अजनाड (सर्वसाधारण स्त्री) : रेखाबाई दर्यावसिंग जाधव (भाजप) यांनी ३१७७ मते मिळवून १६८८ मतांनी विजय प्राप्त केला. विरोधात सुमित्रा दीपक ठेलारी (शिवसेना) १४८९ मते.


सर्वोच्च न्यायालयाने इतर मागास प्रवर्गाबाबत दिलेल्या निकालामुळे तालुक्यातील विखरण, करवंद, अर्थे खुर्द, तर्‍हाडी त.त., वनावल, जातोडा, शिंगावे आणि अजनाड या आठ गणांची पोटनिवडणूक जाहीर झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत विखरण गण बिनविरोध झाला. माघार घेण्याच्या मुदतीत करवंद गण बिनविरोध झाला. त्यामुळे उर्वरित सहा गणांसाठी निवडणूक झाली.


भारतीय जनता पार्टी च सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर आमदार कार्यालयात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोषात आनंद साजरा करुन विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार आबा महाजन, अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणुकीचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडले. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 या पोटनिवडणुकीसाठी 28 हजार 292 महिला व 29 हजार 752 पुरुष असे एकूण 58 हजार 44 मतदार होते. याांपैकी 15 हजार 722 स्री मतदार व 17 हजार 433 मतदार असे एकूण 33 हजार 155 मतदार म्हणजेच 57.12 टक्के यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सहा सप्टेंबरला शिरपूर तहसील कार्यालयात सहा टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. एका तासात सर्व निकाल जाहीर झाले. 
शांततेत पार पडलेल्या निवडणुकीला शेवटच्या दिवशी लागले गालबोट समर्थकांमध्ये राजकीय राढा
निवडणूक जाहीर झाल्यानंतर निकालाची प्रक्रिया पार होईपर्यंत शिरपूर तालुक्यात शांततामय पद्धतीने निवडणुका पार पडल्या मात्र आज दिनांक 6 रोजी निकाल जाहीर होण्याच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर निकालावरून राजकीय समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली असून शिंगावे गणातील निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने काही काळ तणाव पसरला होता मात्र पोलिसांनी परिस्थिती आपल्या हातात घेत तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले मात्र सदरच्या प्रकारात काही लोक किरकोळ जखमी झाले असून काहींना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात देखील दाखल करावे लागले. सदर प्रकारात उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने