जि. प. विषय समिती सभापती निवडीसाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती




धुळे, दि. 23  (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची दोन रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. त्यासाठी 28 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्हा परिषदेचे दोन विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पिठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून सहकार्य करतील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने