*दोंडाईचा-* येथे आज दिनांक ३१/१०/२०२१ रोजी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रभर इंधन दरवाढी विरोधात राज्यव्यापी सायकल रॅली आंदोलन आयोजित करण्यात आली होती. त्यात दोंडाईचा-शिंदखेडा-शिरपुर येथे युवासेना धुळे जिल्हा ग्रामिणच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थिती रँली काढण्यात आली. यावेळी रँलीला अभुतपुर्व यश मिळाल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांनी दिली.
यावेळी रँली दोंडाईचा शिरपूर शिंदखेडा या तीन ठिकाणी काढण्यात आली. त्यात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत. भाववाढीमुळे दैनंदिन जीवनाश्यक वस्तु,तेल,साखर,डाळीचे भाव,घरगुती गँस,डिझेल-पेट्रोल कसे महाग होवून. त्याचा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर कसा वाईट परिणाम झाला आहे, हे पटवून देण्यात आले. ह्यावेळी लोकांनी रँलीला अभुतपुर्व प्रतिसाद दिला व सायकल रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी रँली यशस्वी करण्यासाठी शिरपुर तालुका उपजिल्हायुवाधिकारी अनिकेत बोरसे, विजय पवार, जितेंद्र राठोड यांनी शिरपुर रॅलीचे नेतृत्व केले. तर शिंदखेड्यात युवासेना जिल्हासमन्वयक गणेश परदेशी व तालुका प्रमूख प्रदिप पवार यांनी तर दोंडाईचा शहरात युवासेना उपशहरप्रमुख योगेश बोरसे,गणेश विसावे,सुरेश कोळी,लखन मराठे,नरेंद्र धात्रक,जयेश बडबुजर,मोहित राजानी, नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनावणे, भरत राजपुत तालुकाप्रमुख ईश्वर पाटील,गिरीश देसले, उपजिल्हा अत्तरसिंग पावरा,दीपक चोरमले उपजिल्हा संघटक विभाजोग राणा, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार,राका शेठ,आबा चित्ते, विजय वाडीले,चुडामन बोरसे तसेच शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Tags
news
