वीज कोसळून नुकसान झालेल्या निमगाव केतकी येथील घराची हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी प्रतिनिधी दत्ता पारेकर




प्रतिनिधी दत्ता पारेकर 

 
   पुणे:निमगाव केतकी येथील शेतकरी बबनराव पाटील यांच्या घरावरीत 1 ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठा आवाज होऊन वीज कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले होते आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथील पाटील यांच्या घराची पाहणी करून त्यांना दिलासा दिला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विजेमुळे घराच्या स्लॅपचा काही भाग फुटून खाली आल्याने घराचे मोठे नुकसान झाले. 
  घरावर वीज कोसळल्याने बबनराव पाटील कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घराची पाहणी करून पाटील कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.
   यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव आणि पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने