पितृपक्षात पितरांना स्मरणाचा बुधवार शेवटचा दिवस



बभळाज / प्रतीनिधी
भाद्रपद महीन्याच्या पौर्णिमा पासुन श्राध्दपक्ष म्हणजे पितृपक्षाला सुरुवात होते.२० सप्टेंबर २०२१ रोजी पितृपक्षाला सुरुवात झाली आहे.आज ६ आक्टोंबर २०२१ रोजी पितृपक्ष संपत आहे. या पितृपक्ष काळात आपल्या पितरांचे स्मरण केले जाते व पुर्वजांना या पितृपक्षात अंन्न जल अर्पण केले जाते.पुर्वजांचा नामस्मरणाचा पंधरवडा असे ही म्हटले जाते.पौराणीक मान्यतेनुसार स्वर्गवासी झालेले पुर्वज पितृपक्षात पृथ्वीवर आपल्या परीवाराच्या भेटीसाठी येतात असे मानले जाते.पितृपक्ष दरम्यान पितरांना पिंडदान, अन्न व जल ग्रहण करण्याच्या इच्छेने पितृ आपल्या संतानाकडे राहतात.या दिवसात पितरांना दीलेल्या जलामुळे बळ मीळते व त्यांना परलोकाचा प्रवास करणे शक्य होते.पित्तर सदैव आपल्या परीवाराचे कल्याण करतात.या पक्षाला श्राध्दपक्ष असेही म्हणतात.पाण्यात दुध जव तांदूळ गंगाजल मिळुन तर्पण केले जाते.पितृपक्षात कोणतेही शुभकार्य,पुजापाठ व अनुष्ठान केले जात नाही.या दिवसात नविन वस्तू, दागिने,वस्र खरेदी करत नाही. परंतु दैनंदिन पुजा करता येते.पितृपक्षात हरबरा मसुर वांगी, मांस, लसुण कांदा,काळेमीठ सेवन केले जात नाही.पितृपक्षात भात, दुध,तीळ यांचे पिंडदान तयार केले जाते.पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री आंमावस्येला सर्व मृत पूर्वजांना अर्पण केले जाते व त्यांची क्षमायाचना मागुन आभार व्यक्त केले जाते.या दिवशी कोणत्याही मृत व्यक्तीचे श्राद्ध करता येते.ज्या परीवारांना आपल्या पुर्वजांची तिथी माहीती नाही ते सुद्धा या दिवशी श्राद्ध करतात.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने