शिरपूर प्रतिनिधी- कोळी महासंघ धुळे जिल्हा यांच्या वतीने आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी माननीय तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे सदरच्या निवेदनात महर्षी वाल्मिकी यांची शासकीय स्तरावरून जयंती साजरा करण्यासंदर्भात विविध शासकीय विभागांना आदेशित करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे महर्षी वाल्मिकी जयंती २० ऑक्टोबर २०२१, बुधवार रोजी येत असून दिनांक १२ डिसेंबर २०१९ च्या महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक २२/९/ प्र.क्र.७१/२९, मंत्रालय निर्णयानुसार महर्षी वाल्मिकी जयंती सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरी करण्या बाबत शासन निर्णय आहे मात्र मागील दोन वर्षांपासून असे निदर्शनास आले आहे की सदर शासन निर्णयाचे शासन स्तरावर कोणतेही पालन केले जात नाही व शासकीय स्तरावर महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी केली जात नाही असे निदर्शनास आले आहे
शासकीय स्तरावरती साजरी करणेबाबत...
महाशय,
आम्ही कोळी महासंघ, धुळे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आपणास विनंतीपूर्वक आवाहन करतो की, दिनांक १२ डिसेंबर २०१९ च्या महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक जपूनी २२/९/ प्र.क्र.७१/२९, मंत्रालय निर्णयानुसार महर्षी वाल्मिकी जयंती सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी. परंतु मागील २ वर्षात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करतांना प्रशासन स्तरावर उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे राष्ट्रपुरूष/ थोर व्यक्ती यांची जयंती व शासन निर्णयाचा अवमान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे राष्ट्रपुरूष/ थोर व्यक्ती यांची जयंती व शासन निर्णयाचा अवमान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तरी महाशय आपण आपल्या स्तरावरून सर्व जि.प.शाळा, माध्यमिक शाहा, ग्रामपंचायती, पंचायत समिती, तहसिल, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन इ. यंत्रणेला आदेश द्यावेत व २० ऑक्टोंबर बुधवार रोजी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करावी असे या निवेदनात नमूद केले आहे. सदर
निवेदनावर संघाचेअध्यक्ष यशवंत ओंकार आखडल ,उपाध्यक्ष लोटन शामराव शिरसाठ ,उपाध्यक्ष किशोर घुडकू शिरसाठ,
सदस्य निलेश साहेबराव ईशी,रविंद्र वामन मोहने ,तुळशीराम हीरामण कोळी इ सह्या आहेत.
Tags
news
