माहिती अधिकार कायद्याची सद्यस्थिती विषयावर व्याख्यान....



धुळे- सजग नागरीक मंच आयोजित माहिती अधिकार कायद्याची सद्य:स्थिती व पुढील आव्हाने ह्या विषयावर मासिक चर्चासत्र संपन्न झाले.*
*माहिती अधिकार कायदा २००५ साली संपूर्ण देशात लागू झाल्यास १२ऑक्टोबर २०२१ रोजी १६ वर्षे पूर्ण होत आहेत. १६ वर्षांनंतर माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीची सद्य:स्थिती काय आहे आणि भावी काळात या कायद्यासमोरील आव्हाने काय आहेत याचा लेखाजोखा या विषयातील तज्ञांकडून होणे गरजेचे आहे. यासाठी सजग नागरिक मंचाच्या वतीने ह्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री. विवेक वेलणकर पुणे (प्रशिक्षक यशदा पुणे),श्री. राठी तर प्रमुख वक्ते म्हणुन शैलेश गांधी, मुंबई (मा. केंद्रीय माहिती आयुक्त), श्री. निखिल डे राजस्थान (ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ता),मोहन पाटील (अध्यक्ष युवा परिवर्तन फाऊंडेशन, धावडे व माहिती अधिकार कार्यकर्ता,धुळे) तसेच महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते आदी उपस्थित होते.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने