अर्थे शिवारातून नायब तहसीलदारांना धक्काबुक्की करून वाळू माफियांनी पळविले दोन ट्रॅक्टर,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल






शिरपूर - अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरांना तालुक्यातील अर्थे लगत शहादा रस्त्यावर म्हाळसा पेट्रोल पंपजवळ गस्ती पथकाने ताब्यात घेतल्याने कारवाई सुरू असतांना वाळू माफियांनी नायब तहसीलदार व गस्ती पथकास अरेरावी व धक्काबुक्की करीत दोन्ही ट्रक्टर पळवून नेल्याची घटना 22 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते 4:30 दरम्यान घडली असुन शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


        तालुक्यातील नदी नाल्यातून बेसुमार वाळूचा उपसा करून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी पहाटे नायब तहसीलदार पेंढारकर हे मंडळ अधिकारी एस सी गुजर तलाठी पी पी गिरासे,देवेंद्र येशी,डी एस गुशिंगे,आर एन पवार, व्ही बी नागलोत, सतिष पाटोळे यांच्या पथकासह शिरपूर शहादा रस्त्यावर गस्ती घालीत असतांना 4 वाजेच्या सुमारास म्हाळसा पेट्रोल पंप जवळ विना नंबर असलेले निळ्या रंगाचे आयशर व लाल रंगाचे महिंद्रा असे दोन ट्रक्टरमधून वाळूची अवैध वाहतूक करतांना आढळून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले दरम्यान कारवाई सुरू असतांना  ट्रक्टर मालक याने घटनास्थळी येत दमदाटी करीत नायब तहसीलदार ए बी पेंढारकर  यांना धक्काबुक्की करीत मोठा दगड घेत मारण्याचा प्रयत्न करून दोन्ही ट्रॅक्टर वाळूसह पळवून नेल्याची फिर्याद तलाठी डी डी येशी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.


         दाखल फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक अमोल उर्फ भुऱ्या शालीक पाटील,मोतीलाल पूर्ण नाव माहीत नाही तसेच ट्रॅक्टर चालक रमेश नारायण पावरा व राकेश साहूजा पावरा सर्व रा. बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने