मालपुर येथील जेष्ठ नागरीक व श्रावणबाळ, योजना लाभार्थीना पेशन्स अभावी वंचित.




(श्री.प्रभाकर  आडगाळे.) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे तब्बल पाच महिणा झालेत परंतु अध्याप बॅंकेत पैसे पडलेनाहीत म्हणुन  जेष्ठनागरिक,श्रावणबाळ योजनाचे लाभार्थी देखील चिंतेत आहेत जिवन जगायचे कसे ,औषधपाण्यासाठी हातात पैसे नाहीतअशी व्यथा  निर्भिडन्युज प्रतिनिधी बोलतांना सांगितली.  काही जेष्ट नागरिकांनी महर्षी वाल्मिक मंदिरात सभा आयोजित केली होती. श्रीराम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.भगवान माणिक कोळीसांगितले. जुन महिण्यापासुन तर आज बावीस आॅक्टोबर महिणा संपण्याचा मार्गावर आहे अध्याप बॅंकेत पैसे पडले नाहीत लाभार्थी चिंतेत आहेत दसराला देखील पैसे नसल्यामुळे नाराजी व्यक्त करित आहेत. तरी मेहरबान  तहसिलदार साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घेवुन सदर योजनांचे पैसे बॅंक खातेवर टाकण्याची विनंती करित आहेत दिवाळी तरी गोड होईल अशी आशा बाळगतो.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने