*शिरपूर (प्रतिनिधी)* : ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे. मात्र वीस टक्के राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून गावासह परिसराचा विकास करणे शक्य असुन हे मिलींद पाटील यांनी प्रत्यक्षात कृतीतून दाखवले आहे. वेळेचे महत्व ओळखून त्यांची चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाप्रमाणे सर्व पक्षांच्या नेत्यांना एकाच मंचवर आणले असल्याचे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे केले.
हिंगोणी बु।। येथे जलशुद्धीकरण सयंत्र (RO फिल्टर) लोकार्पण सोहळा व 100 टक्के लसीकरण केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी मेडिकल ऑफिसर व आरोग्य सेवकांचा सत्कार सोहळा दि.14 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या आर.ओ. फिल्टरचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी फित कापून केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, उदघाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता डॉ.जितेंद्र ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना डॉ.तुषार रंधे म्हणाले की, गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य हे सर्व पुढाऱ्यांकडे जाऊन विकास कामांची मदत मागत असतात. गावाच्या समस्यांसाठी संघर्ष करतांना दिसतात. गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमी सोबत आहोत. आरोग्य विभागाच्या सर्व टिमचे अभिनंदन करतो. हिंगोणी गावा प्रमाणेच परिसर देखील शंभर टक्के केव्हा होईल याकडे लक्ष द्यावे, असे यावेळी डॉ.रंधे यांनी सांगितले.
यानंतर बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके म्हणाले की, मिलींद पाटील यांनी वेळेचे महत्त्व ओळखून जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांना निमंत्रीत केले. चिपी विमानतळ कार्यक्रम प्रमाणे पालकमंत्री जरी आमचे शिवसेनेचे असले तरी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या देखील मदतीची गरज आहे. पालकमंत्री शिवसेनेचे असले तरी मात्र चावी जि.प.अध्यक्ष यांच्याकडे असतात. 80 टक्के समाजकारण करणे या भावनेणे शिवसेनेने आजतोवर समाजकारण केले. मिलींद पाटील देखील 80 टक्के समाजकारण करत आहेत. यामुळे त्यांनी शिवसेने पक्षात यावे यासाठी निमंत्रीत करु. या परिसरात शिवसेना वाढण्यासाठी मदत होईल. मिलिंद पाटील हे दुरदृष्टी ठेऊन सर्व पक्षीय नेत्यांना घेऊन विकासकाम करत आहेत.यामुळे मिलींद पाटीलांनी शिवसेना पक्षात प्रवेश करावा असे निमंत्रण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषण दरम्यान सांगितले की, राजकारण करत असतांना समाजकारण हाच दृष्टीकोण ठेवावा. राजकारण हे समाजसेवेचे साधन आहे. याचा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासासाठी फायदा घ्यावा. मात्र काही जण राजकारणातून स्वताचे घर भरण्याचे कामे करत असतात. आपल्या खिशातून कोणाला पैसे द्यायचे नाही तर जनेतेचा पैसा जनतेपर्यंत पोहचवावा असल्याने प्रामाणिक प्रयत्न करावा. मिलिंद पाटील हे हिंगोणी बु.गावाच्या विकासासाठी त्यांच्या आरोग्यासाठी जलशुद्धीकरण संयत्र बसवले गावाच्या विकासासाठी आमच्या परीने मदत करु असे आश्वासन यावेळी डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी दिले.
प्रस्ताविक दरम्यान हिंगोणीचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील म्हणाले की, चिपी विमानतळ उद्घाटनाच्या धर्तीवर हिंगोणी बु.येथे देखील सर्व पक्ष एका मंचावर बोलवले आहे. गेल्या 20 वर्षात नेहमीच 20 टक्के राजकारण व 80 समाजकारण केले. यामुळे गावाच्या विकासासाठी सर्वांकडून कामे मिळण्यास मदत होत आहे. गावातील जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शुध्द पाणी मिळावे हाच यामागील प्रामाणिक प्रयत्न आहे. गावात आठ वेळा कँम्प राबवून हिंगोणी बु.गाव शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाले. यासाठी आरोग्य विभागाची मोलाची मदत लाभली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, विशेष अतिथी म्हणून शिरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता डॉ.जितेंद्र ठाकूर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, हिंमत महाजन, माजी उपतालुकाप्रमुख राजेंद्र गुजर, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीचे मेडिकल आँफिसर डॉ. संदीप गिरासे, आरोग्य सहायक गुलाब निळे, जि.प.सदस्य देवेंद्र पाटील, शिरपुर पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, शिरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिरीष पाटील, हिसाळेचे सरपंच रामेश्वर पाटील, हिंगोणीचे माजी सरपंच नानाभाऊ पाटील, पं.स.सदस्य निंबा पाटील, शिंगावेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमा आप्पा, शिवसेनेचे शहरप्रमुख देवेंद्र पाटील, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, युवासेनेचे तालुकाप्रमुख विजय पावरा, दिनेश गुरव, मिलिंद पाटील, भटु पाटील, दगा भिल आदी उपस्थित होते.
Tags
news


