दोंडाईचा येथे आज विजयादशमी दिवशी श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटर हाॅस्पिटलचे शुभारंभ



दोंडाईचा - (अख्तर शाह)
शहरात कोरोना काळात खुप गंभीर समस्या निर्माण झाली होती अनेक रूग्णांना वेळेवर आय.सी.यु ची कमतरता असल्याने,   आयसीयू बेड मिळाले नाही  म्हणून प्राण वाचवता  आले नाही पैसा असुन वेळेवर उपचार मिळाले असे संकट आले 
म्हणून शिदंखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे चार  डॉक्टरानी मिळून संकल्प केले की दोडाईचात सुसज्ज मल्टी स्पेशलिस्ट  हाॅस्पिटल असले पाहिजे असा विचार शहरात वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टरांनी केला.डाॅ.निलेशकुमार पवार एम.डी मेडिसीन
डाॅ.भुषण चौधरी पाडूरंग चौधरी
डाॅ.जगदीश कानतीलाल चौधरी
डॉ प्रशांत सुभाष जाधव
 या चार ही  डाॅक्टरांनी व व्यावस्थापक डॉ मनिष जयसिंग    यांनी एकत्र येऊन चांगली रूग्ण सेवा मिळावी या उद्देशाने श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटर    हाॅस्पिटलचा शुभारंभ विजया दशमीचा 
शुभ मुहूर्तावर  स्टेशन भाग येथे    आज भव्य दिव्य हाॅस्पिटल सुरू झाले या हाॅस्पिटल मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत व चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल या हाॅस्पिटल मध्ये  एका छता खाली पच बेड सुसज्ज आय.सी.यू .दोन सुसज्ज ऑपरेशन थेटर . स्पेशल रूम.
जर्नरल वार्ड,  वेटीग रूम . २४तास  लॅब .डिजिटल एक्स-रे  अशा अनेक सुविधा एकाचं ठिकाणी मिळतील या पाचही डाॅक्टरांचे शहरात पुर्वीचे हाॅस्पिटल आहेत हे सर्व डाॅक्टर वेगवेगळ्या रोगाचे तज्ञ आहेत परंतु काही नविन सुविधा देता येतिल का  यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन हा हाॅस्पिटल सुरू केला पुढील  काळात शासनाच्या जे काही अरोग्य विषयी योजना जसे आयुष्यमान भारत  योजना महात्मा फुले योजना या योजना लवकरच सुरू होतील व त्याद्वारे  गरीब सामान्य दारिद्र्य रेषेखालील लोकांना या उच्च कोटीतल्या व उच्च सेवेच्या हॉस्पिटलची सेवा मिळणार आहे
तसेच मुंबई. नाशिक. जळगाव.    धुळे.येथून सुपर स्पेशलिटी डॉक्टर महिन्याचा वेगवेगळ्या दिवशी  विजिट देणार आहेत 
तसेच सुविधा  मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल २४  तास रुग्णांना सेवा देण्यात येईल.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने