शिरपूर तालुक्यात पुन्हा स्पिरिट च्या अवैध वावर पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे स्पिरिट साठा जप्त



शिरपूर प्रतिनिधी  -शिरपूर तालुका हा मागील काळात स्पिरीटचा तालुका म्हणून राज्यभरात उदयास आला होता मात्र कालांतराने सततच्या पोलिसी कारवायांमुळे व अनेक बनावट मदय  किंग अटकेत आल्यानंतर काही काळ तालुक्याचे वातावरण थंडावले होते. मात्र आता पुन्हा स्पिरिट सारख्या पदार्थांच्या अवैध वावर तालुक्यात पुन्हा वाढला आहे का याबाबत शंका उपस्थित होत आहे.
 शिरपूर येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकच्या उपमहानिरीक्षक पथकाचे व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हजारो लिटर स्पिरीटचा साठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी नाशिकच्या पथकाने शिरपूर शहर व तालुका पोलिसांच्या मदतीने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील दहीवद शहरात होटेल करणी कृपा जवळ लाखोंच्या स्पीरिट साठा जप्त केला आहे .अवैधरित्या स्पिरिट साठा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपमहानिरीक्षक पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यावरून सदरच छापा टाकण्यात आला यात दोन टँकर सह लाखो रुपये किमतीच्या हजारो लिटर स्पिरिट साठा ताब्यात घेण्यात आला आहे .या प्रकरणात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदरची कारवाई उपमहानिरीक्षक पथकाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील ,शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्यासह पोलीस नाईक पंकज पाटील, नरेंद्र शिंदे, अमित रणमाळे, स्वप्निल बांगर इत्यादी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने