धुळे प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तापी नदीवरील सुकवद तापी नदी पुलावर दि 5 ऑगस्ट रोजी एका 30 ते 35 वयोगटातील महिलेचे प्रेत संशयास्पद परिस्थितीत आढळून आले होते. यासंदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली होती. सदरच्या आकस्मात मृत्यू संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीच्या आधारे माहिती प्राप्त झाली होती की दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री सदर महिलेसोबत एक पुरुष हा गुजरात पासिंग च्या कार सोबत येऊन गप्पा मारत उभे होते. यावरून सदर महिला व पुरुष गुजरात राज्यातील असावेत असा कयास धरून व तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून स्थानिक गुन्हे शाखा येथील एक पथक सूरत गुजरात येथे रवाना करण्यात आले होते. सदरच्या पथकाने मयताचे फोटो हे सुरत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील काही लोकांना दाखवले असता सदरची महिलाही दिंडोली उधना सुरत परिसरातील असल्याचे व तिचे नाव मायाबाई संदीप पाटील असल्याचे समजले .त्यानंतर सदर पथकाने तिच्या नातेवाईकांच्या शोध घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरची महिलाही तिच्या मित्र मनोज उर्फ युवराज पाटील यांच्यासोबत दिनांक 4 ऑगस्ट दुपारी 2 वाजे पासून कार मध्ये बसून नंदुरबार येथे गेली असल्याचे व ती अद्याप पर्यंत परत आली नसल्याचे सांगितले. सदर पथकाने मयताचे फोटो नातेवाईकांना दाखवले असता त्यांनी ओळख पटवून ती महिला मायाबाई पाटील असल्याचे सांगितले. यानंतर सदर पथकाने मनोज उर्फ युवराज पाटील यांचा शोध घेतला असता तो मिळून आला होता त्यास नंदुरबार येथे येण्यासाठी वापरलेल्या कार सोबत ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय धुळे येथे आणून त्याची बारकाईने व कसून विचारपूस केली असता त्याने मायाबाई देत असलेल्या त्रासाला कंटाळून तिला क्लोरोफॉर्म चा वापर करून गुंगी आल्यानंतर तिचा खून केल्याची कबुली दिली आहे .आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल जप्त करण्यात आला आहे यासंदर्भात शिंदखेळा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 148/ 2021 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाई पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Tags
news


