महावितरणाचा भोंगळ कारभार महावितरणाच्या पोलवर काम करणाऱ्या कामगाराचे थोडक्यात बचावले प्राण



                    
नाशिक= येवला तालुक्यातील तळवाडे गावातील महावितरणाच्या कंत्राटी कामगाराचा जीव वाचला आहे परमीट एका लाईनचे आणि काम दुसऱ्या लाईन वर चालू असा महावितरणाचा भोंगळ कारभार आज उघडकीस आला आहे.
   तळवाडे येथील ११ के वी वर काम चालू  असताना अचानक विद्युत केंद्रातिल विज नियंत्रित करणारे फ़ीडर अचानक बंद पडल्याने विद्युत प्रवाह सुरू झाला कर्मचारी अमोल भगवान पाटील हा पोलवर काम करत असताना विद्युत प्रवाह  चालू झाला आणि तो भाजून गंभीर जखमी झाला आहे स्थानिक रहिवासी असलेल्या सुनील आरखड़े व अनिल आरखडे यांनी प्रथमोउपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय येवला येथे घेऊन गेले असता तो जास्त भाजल्याने त्यास जिल्हा रुग्णालय नाशिक येथे हलवण्यात आले आहे ह्य घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने