शिरपूर - भारतीय स्वातंत्र्याच्या अंमृत महोत्सव वर्षानिमित्त निघालेल्या केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या सायकल रॅलीचे धुळे जिल्ह्यात हिसाळे ता. शिरपूर येथे आगमन झाले.ग्रामंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अंमृत महोत्सव साजरा केला जात असून सरकारने सन २०२१ हे एकात्मता वर्ष घोषीत केले आहे. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या गडचिरोली युनिटच्या वतीने गडचिरोली ते केवडीया ( गुजरात) येथील स्टॅच्यु अॉफ युनिटी अकराशे की.मी.पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत एकूण ९० जवान सहभागी असून २५ जवान सायकलिस्ट आहेत. या रॅलीचे नेतृत्व असि. कमांडर चेतन शेलोटकर हे करीत आहेत. या रॅलीचे आज सकाळी ११ वाजता धुळे जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी हिसाळे ता. शिरपूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी धुळे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, थाळनेर पो.स्टे. सपोनि उमेश बोरसे, पोउनि मनोज कुंवर, सरपंच सौ. वर्षा रामेश्वर पाटील,उपसरपंच रतन बाबू भिल, सदस्य सौ. सुवर्णा संभाजी पाटील, सौ. प्रतिभा वसंत पाटील, दत्तात्रेत नानाभाऊ पाटील, सुरेश पाटील, रामेश्वर पाटील, संभाजी पाटील, अभय पाटील, पो.पा. नानाभाऊ परदेशी, दिलीप बाबा पाटील, प्रकाश कौतीक पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रॅली गडचिरोली युनिटच्या वतीने काढण्यात आली आहे. रॅलीचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दि. १२ अॉक्टिबर रोजी करण्यात आले. ११०० कि.मी. अंतराच्या या रॅलीत अनेक अडचणींचा सामना आम्ही केला पण त्याच्या दुपटीनते लोकांकडून प्रेम मिळाले. जागोजागी भव्य स्वागत करण्यात आले. तीच आमची प्रेरणा आणि उर्जा आहे. आतापर्यंत आम्ही ८०० कि.मी. प्रवास पुर्ण केला आहे. रॅलीचा समारोप अखंड भारताच्या एकात्मतेचे प्रतिक असलेल्या गुजरात राज्यातील केवडीया स्थित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु अॉफ़ युनिटी येथे होणार आहे. आम्ही या रॅलीतून देशाल एकात्मतेचा व देशभक्तीचा संदेश देत आहोत. आमच्याप्रमाणेच पाकीस्तानच्या सीमेवरून जैसलमेर येथुन सिमा सुरक्षा दल, चिनच्या सिमेवरून इंडो तिबेटीयन सुरक्षा बल, नेपाळच्या सिमेवरून सशस्त्र सेना दल व दक्षिणेतून केंद्रिय अौद्योगिक सुरक्षा बल हे दि. ३१ अॉक्टोबर रोजी सायकल रॅलीने एकात्मता कार्यक्रमात केवडीया येथे पोहचत आहेत. अशी माहिती रॅलीचे प्रमुख असि. कमांडट चेतन शेलोटकर यांनी दिली. रॅलीत कमांडर मुकेश कुमार, हेल्थ कमांडर शैलेंद्र कुमार, असि. कमांडेंट संजय बमोला, डिवायएसपी शरद घड्याले, संजय कदम इ. अधिकारी सहभागी झाले आहेत. रॅलीचे हिसाळे बसस्थानकावर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच गावातल्या मुख्य चौकापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. तिथे मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर सहभागी अधिकारी व सायकलिस्ट जवानांचा पुष्पगुच्छ देवून स्वागतपर सत्कार करण्यात आला. सभेत चेतन शेलोटकर यांनी रॅलीचा उद्देश विशद केला. सीआरपीएफच्या वतीने सरपंच सौ. वर्षा पाटील यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सभेचे सुत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.जवानांना व सर्व उपस्थितांसाठी रामेश्वर पाटील यांच्या कडून स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
Tags
news



