शिरपूर - दिनांक 19-10-2021 मंगळवार या रोजी नाशिक राष्ट्रवादी भवन येथे अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या तर्फे आपल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब (कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांना फार्मासिस्ट covid योद्धा घोषित करा व 24 ऑक्टोबरला होणारे आरोग्य भरतीमध्ये जाणारे विद्यार्थी यांना बस किंवा ट्रेनमध्ये मोफत सवलत देने अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली त्यावेळेस राष्ट्रवादीचे माजी आमदार, दिलीपराव शंकरराव सोनवणे, प्रदेशाध्यक्ष दत्ता मारोती खराटे, प्रदेश सचिव रोहित वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण, डॉक्टर पंकज चौधरी प्रदेश उपाध्यक्ष, धुळे विभाग प्रमुख चेतन दिलीपराव सोनवणे उपस्थित होते. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य भरती मधील गोंधळ तात्काळ दूर करून विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा, डॉक्टर पंकज चौधरी प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य)
24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य भरती बद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . म्हणजेच यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरले आहेत, ते फॉर्म भरताना त्यांनी आपल्या जवळील केंद्र हे प्राधान्याने नमूद केले आहेत. पण मूळ प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना आता मिळत असताना प्राधान्य क्रमांक नसलेले केंद्र मिळत आहेत, उदाहरण नागपूर शहरातील विद्यार्थ्यांना नांदेड परीक्षा केंद्र भेटणे तसेच अकोला येथील विद्यार्थ्यांना देखील जवळपास जास्त अंतराचे केंद्र मिळाले आहेत . असे काही प्रकार समोर येत आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांवर नाहक आर्थिक बोजा येणार असून अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही . य। आधी असेच कारण मुळे 25 सप्टेंबरला होणारी आरोग्य भरती काही कारणास्तव रद्द करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचं आर्थिक नुसकान झालं आहे आणि आता हा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल ढासळत आहे आणि एकाच जिल्ह्यात अर्ज केलेल्या 2 शिफ्ट मधील विद्यार्थ्यांना 2 पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहेत . त्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक वर्षे अभ्यास करून दोन पदासाठी परीक्षा देण्यास इच्छुक आहेत त्यांना परीक्षा देता येणार नाही. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होणार आहे तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील होणार आहे,
आपणास विनंती आहे की सदर सर्व अडचणी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा जेणेकरून त्यांना 24 ऑक्टोबरच्या आरोग्य भरतीसाठी विद्यार्थ्यांना जाता येईल अशी मागणी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी यांनी आरोग्यमंत्री व मा श्री. राजेश टोपे साहेब आणि आरोग्य मुख्य सचिव डॉ मा श्री प्रदीप कुमार व्यास अपर मुख्य सचिव आरोग्य विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच या आधी त्यांना जाण्या-येण्यासाठी वाहतूक बस सेवा व रेलवे सेव।ही मोफत देण्यात यावी ही मागणी याआधी केली होती ती सुद्धा यात मान्य करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Tags
news


