शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे शेतकऱ्यांना कृषीदूतांमार्फत बीजप्रक्रिया कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिरपूर पंचायत समिती सदस्या संगीता गुजर यांच्या उपस्थितीत कृषिदूत राज शशिकांत पाटील याने बीज प्रक्रिया मार्गदर्शन केले. बीजप्रक्रिया कशाप्रकारे करावी यासंदर्भात गावातील काही निवडक शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करून दाखवली. बीज प्रक्रिया केल्यामुळे पीक मर कमी होत असल्याचे यावेळी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते वा चांगला भाव मिळतो त्यामुळे आर्थिक समृद्धी येत असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले.
या कृषिदूत मार्गदर्शन कार्यक्रमाला अर्थे येथील कृषिदूत विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.


