प्रा.डॉ.रजनी लुंगसे लिखित मानव सेवा योगी संत गाडगे महाराज पुस्तकाचे जि.प.अध्यक्ष तुषार रंधे यांचा हस्ते प्रकाशन
शिरपूर : राष्ट्रीय संत शिरोमणी श्रीसंत गाडगे महाराज यांचा जिवनावरील लिखित पुस्तके हे राज्यातील प्रत्येक परिट (धोबी) समाज बांधवांचा घराघरात असावे असे मत अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी व्यक्त केले. येथील प्रा. डॉ. रजनी नकुल लुंगसे लिखित मानव सेवा योगी संत गाडगे महाराज पुस्तकाचे जिप अध्यक्ष तुषार रंधे यांचा हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणुन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी आपले विचार व्यक्त केलेत. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्था खजिनदार श्रीमती आशाताई रंधे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणुन परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, किसान विद्या प्रसारक संस्था सचिव निशांत रंधे, माजी जि. प सदस्या सिमा रंधे, शहरातील उद्योगक अशोक बेडिस्कर, उपप्राचार्य एस.टी. ठाकरे, व्ही.बी. सोनवणे, नकूल लुंगसे, म ज्यो फुले विद्यालय मुख्याध्यापक कल्पेश वाघ, शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, परिट (धोबी) सेवा युवक मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, बॅन्क मॅनेजर सागर शेवाळे, केतकी शेवाळे, महेश सोनवणे, दिलीप सगरे, विजय भिलाणे, जितेंद्र सोनवणे, छोटू धोबी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात नुकताच संपन्न झाला. किसान विद्या प्रसारक संस्था खजिनदार श्रीमती आशाताई रंधे म्हाणाल्या की आपण एक पत्र लिहतो मात्र अनेकदा चुका होतात व चुका दुरुस्ती करत करत खुप वेळ वाया जातो मात्र पुस्तक लिहणे एवढे सोपे नसुन आपल्या परीट समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शिका माजी महिला प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. रजनी लुंगसे यांनी लिखित मानव सेवा योगी संत गाडगे महाराज हे पुस्तक अतिशय वाचनिय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. रजनी लुंगसे लिखित मानव सेवा योगी संत गाडगे महाराज पुस्तकाचे भाषांतर करून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये पाठवण्याचे काम सुरू होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन के. व्ही. बोरसे यांनी केले. आभार अनिल लुंगसे यांनी मानले.
Tags
news


