त्या’ 811 शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक प्रमाणिकरणासाठी विशेष मोहीम सुरू

धुळे, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 मध्ये धुळे जिल्ह्यातील 811 शेतकऱ्यांचे कर्जखाते आधार क्रमांक प्रमाणिकरणासाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हा उपनिबंधक श्री. देशपांडे यांनी म्हटले आहे, राज्य शासनाच्या सहकार विभागाकडील शासन निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., धुळे, सर्व राष्ट्रीयकृत, व्यापारी व खासगी बँकांमार्फत महात्मा जोतिराव फुले शेतकरी व कर्जमुक्ती योजना- 2019 या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणिकरण बंधनकारक आहे.

जानेवारी 2021 अखेर शासनाकडून प्रसिध्द झालेल्या याद्यांपैकी धुळे जिल्ह्यातील 811 कर्जखाती आधार प्रमाणिकरणासाठी सप्टेंबर- 2021 अखेर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. आधार प्रमाणिकरणासाठी शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था, धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा यांच्या  कार्यालयास व सर्व संबंधित बँकांना पाठविलेली आहे. प्रलंबित असलेल्या कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरणाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 
ही योजना अंतिम टप्प्यात असल्याने आधार प्रमाणिकरणासाठी ही अंतिम, शेवटची संधी असून आधार प्रमाणिकरण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यास कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या व कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास किंवा संबंधित बँकेत तत्काळ संपर्क करावा. तसेच शिल्लक आधार प्रमाणिकरण यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर, सीएससी सेंटरवर विहित मुदतीत तत्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
माणिकरणासाठी विशेष मोहीम सुरू

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने