स्व. नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात शैक्षणिक साहित्याचे वाटप. होळनांथे/ प्रतिनिधी




होळनांथे - 
येथील स्व. नारायण गजमल पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ शिरपूर येथील अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात शैक्षणिक साहित्य व अल्प आहार वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण बडगुजर, जयेश पाटील, दक्ष नागरिक युवा मंचचे योगेश पाटील, बबलू परदेशी, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भिल, सामाजिक कार्यकर्ते भटेसिंग राजपूत, सर्पमित्र मुक्तार फकीर आदींच्या हस्ते स्व. नारायण पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील पिंटू या विद्यार्थ्याने स्व. नारायण पाटील यांचे काढलेले पेन्सिल स्केच व विद्यार्थ्यांनी बनविलेले आकर्षक दिवे आयोजकांना भेट देण्यात आलेत.  त्यानंतर चित्रकला, हस्तकला व  विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कला शिक्षक योगेश दाभाडे, वैद्यकीय अधिकारी स्वप्नील देशमुख, विशेष शिक्षक दीपक पाटील, गणेश धनगर, रणजीत मोरे, काळजी वाहक,राहुल पाटील, राहुल गुजर आदींचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने