भिशीच्या वादातून हॉटेल चालकाला मारहाण; हॉटेल मधील साहित्याचीही केली तोडफोड दत्ता पारेकर




दत्ता पारेकर 

पुणे:शिक्रापूर येथे बेकायदेशीर भिसीच्या वादातून एका हॉटेल चालकाला मारहाण करीत हॉटेलमधील साहित्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवराज जालिंदर भुजबळ व एका महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर येथील प्रवीण शिवरकर यांनी भुजबळ यांच्याकडे भिसी सुरू केली होती. शिवरकर यांच्याकडे भिसीचे काही पैसे बाकी असल्याने युवराज भुजबळ व महिलेने शिवरकर यांच्या हॉटेलमध्ये येत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी प्रवीण शिवरकर यांनी सध्या लॉकडाऊनमुळे माझी परिस्थिती बिकट आहे, मी हळू हळू पैसे देऊन टाकतो असे म्हटले असता, भुजबळ यांनी प्रवीण शिवरकर यास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करत हॉटेलमधील साहित्यांची तोडफोड केली. याबाबत प्रवीण शांताराम शिवरकर (रा. मलठण फाटा, शिक्रापूर ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी युवराज जालिंदर भुजबळ व एक महिला (दोघे रा. बुधेवस्ती शिक्रापूर ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने