तुळजाभवानी देवीचे हर्षवर्धन पाटील यांनी घेतले सहकुटुंब दर्शन प्रतिनिधी दत्ता पारेकर




प्रतिनिधी दत्ता पारेकर 

   पुणे:राज्यातील सर्वच मंदिरे घटस्थापनेच्या दिवशी सुरू झाले असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिरही सुरू झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्याची प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
  यावर्षी शारदीय नवरात्री उत्सव गुरुवार दि.7 आक्टोबर पासून सुरू होत आहे. सर्वत्र हा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील, मुलगा नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने