ईद ए मिलाद औचित्य साधत येवल्यात रक्तदान शिबीर संपन्न. नाशिक शांताराम दुनबळे.




नाशिक== येवला येथे  ईद-ए-मिलाद या मुस्लिम बांधवांच्या पवित्र औचित्य साधत सणानिमित्त  अझहरभाई शहा, नदीम अन्सारी, शहर-ए-काझी काझी सलिम उद्दीन निजभाई,जमीर अन्सारी,अकबर शहा,अब्दुल रहीम मेहवी, निसारभाई निंबूवाले,दादाभाई आदींनी येवले शहरात महाराष्ट्र राज्याचे  अन्न व नागरी पुरवठा मंञी तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.छगनराव भुजबळ साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते,त्याच्या उदघाटन प्रसंगी ना.छगनराव भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे ,जिल्हा बॅंकेचे संचालक.अॅड माणिकराव शिंदे, प्रा.अर्जुन कोकाटे, दिनकर दाणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात राष्ट्र सेवा दलाचाही सहभाग होता.सेवा दलाच्या पाच कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले.दुपारी साडेबारा वाजेपर्यंत १०१ बाटल्या रक्त रक्तदात्यांनी दिले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने