शिरपूर - मा.जिल्हाधिकारी सो धुळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार संपुर्ण धुळे जिल्ह्य़ात दि 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भव्यलसिकरण कार्यक्रम राबविण्यात आला.
प्रा.आ.केंद्र रोहिणि अंतर्गत एकुण आठ उपकेंद्र कार्यरत असुन त्यातील सहा उपकेंद्र ही पूर्णता आदिवासीबहुल व दुर्गम भागातील आहेत.
डॉ.राष्ट्रपाल अहिरे वैद्यकिय अधिकारी यांनी रोहिणि पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून व सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यावर व आदिवासीबहुल पाड्यावर लसीकरणाची जनजागृती केली ,आरोग्य कर्मचारीवर्ग, आशासेविका यांनी दिलेल्या सकारात्मक गृहभेटी च्या माध्यमातून आजपर्यंत कार्यश्रेत्रातिल व शिरपुरच्या जवळपास *विसहजार* लोकांना लसदेण्याचे काम शक्य झाले आहे.
सुरुवातीस रोहिणि परिसरातील लोकांचा कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणास मोठ्या प्रमाणात विरोध होता,परंतु जिपसदस्य श्री कैलास पावरा यांनी विश्वमंडळ सेवा आश्रम शिरपुर ,आरोग्य विभाग रोहिणि यांच्या सहयोगाने आदिवासीबहुल भाग पिंजून काढला व लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले.लुपिन फाऊंडेशन धुळे यांचेही लसीकरण काळात विशेष सहकार्य लाभले,प्रसिद्धि वाहनाच्या सहाय्याने लुपिन ने प्रचार व प्रसिद्धी केली.
व्यापक प्रसिद्धि व समाजमनातील शंकांचे समाधान झाल्यामुळेच आज एकाच दिवसात सर्व उपकेंद्रात ऐकुन 1897 एवढ्या लोकांचे लसीकरण करणे शक्य झाले.त्याचबरोबर
लुपिन वेल्फेअर फाऊंडेशन च्या वर्धापनदिनानिमित्त रोहिणि येथे त्वचारोगनिदान शिबीर संपन्न झाले.डाॅ.राहुल शिंदे त्वचारोगनिदान तज्ञ धुळे यांनी जवळपास शंभराच्या वर रुग्णांची तपासणी करुन प्राथमिक औषधोपचार मोफत दिला गेला.
आदिवासीबहुल भागांत प्रामुख्याने रक्तक्षयाची कमतरता बहुतांश लोकांमध्ये जाणवते,त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होवुन व शरीराची योग्य निगा न ठेवल्यास त्वचेचे विकार निर्माण होतात त्यासाठी सकष आहार,वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता गरजेची असते असे त्यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नमुद केले.
कोव्हिड लसीकरण व त्वचारोगनिदान शिबीराची सुरवात महात्मा गांधी व जनहितवादी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन झाले.
डाॅ. राहुल शिंदे त्वचारोगतज्ञ,श्री संदिप झनझने जिल्हासमन्वयक लुपिन,डाॅ.आनंदराव पवार,डाॅ.प्रितम माळी,श्री शैलेन्द्र पाटिल, श्री दिलीप सांगळे,श्री जनार्दन देशपांडे श्रीमती संगीता शिंदे,श्रीमती जमुना पावरा उपस्थित होते.
प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या सर्व कर्मचारीवर्ग, आशास्वयंमसेवक व ग्रामस्थ रोहिणि पंचक्रोशी यांच्या सहकार्यातून व समन्वयातून दोन्ही उपक्रम यशस्वी झालेत.यापुढेही प्रा.आ.केंद्र रोहिणि येथे सातत्यपूर्ण आरोग्य उपक्रम व आरोग्य सेवा सुरळित पुरविली जाईल अशी खात्री देत डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी मान्यवरांचे व प्रतिसादाबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले
Tags
news
