शिरपूर - आज रोजी शिरपूर नगरपालिका येथे इदगाह नगर वॉर्ड क्र.६ येथे असेलेल्या नाला तसेच तेथील रस्त्याच्या बांधकाम मुद्द्यावर निवेदन देण्यात आले,शिरपूर शहर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते पण शहरातील मध्यवर्ती भागात नाला तसेच नाल्याला संरक्षण भिंती नसणे व त्यावर रस्ता नसणे ही खूप लाजिरवाणी बाब आहे,त्याभागात लाभलेले निष्क्रिय नगरसेवक देखील तेवढेच जबाबदार आहेत सध्या तालुक्यात डेंगू,मलेरिया व साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे आणि त्यातल्या त्यात या नाल्यांमध्ये असलेले घाणीचे साम्राज्य यामुळे लोकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तसेच पावसाळ्यात तुंबून या गटारी रस्त्यावर येतात मग "रस्त्यात गटार की गटारीत रस्ता" याप्रकारची परिस्थिती तेथे निर्माण होते तरी नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून नाल्याचे व रस्त्याचे काम सुरू करून पूर्तता करावी असे निवेदनामार्फत शिवसेना-शिवशक्ती वाहतूक सेनने मागणी केली आहे यावेळी एस.टी.कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजुजी टेलर,युवासेना उपजिल्हायुवाधिकारी अनिकेत बोरसे,शिव-शक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,उपजिल्हाध्यक्ष मसूदभाई शेख,तालुकाध्यक्ष वाजीद मलक,युवासेना उपतालुकाधिकारी वाल्मिक कोळी,शहराध्यक्ष विजय पवार,रेहान काझी,सुनील सूर्यवंशी, शहर सचिव गणेश बिरारी,उपशराध्यक्ष जावेद शेख,आबा मराठे,इरफान मलक,समीर शहा,समीर सैय्यद, मुख्तार बेग, तौसिफ बेग, मोसीन शेख, टिपू शेख,कालीम शेख,रहीम शेख, अशपाक मलक,मेहमूद शेख,सुरेश कुवर, प्रवीण सुतार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
news


