मुंबई-आग्रा महामार्गावर सात ते आठ वाहनांच्या विचित्र अपघात 3 ते 4 मयत तर अनेक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर बिजासन घाटातील पळासनेर गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात एकापाठोपाठ एक सात ते आठ वाहने एकमेकांना धडकले असून या भीषण अपघातात तीन ते चार लोकांच्या मृत्यू झाला असून काही लोक गंभीर झाले गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे .धडक इतकी जोरदार होती की अनेक वाहनांच्या यात चुराडा झाला आहे. त्यातून अपघाताची तीव्रता दिसून येते.


मध्यप्रदेशातील इंदोर कडून कडून शिरपूर कडे येणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर गावाजवळ आज साय 8 वाजेच्या सुमारास एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात सदरच्या अपघात झाला असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे .घटनेचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मदत कार्य सुरू केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे हलविण्यात आले आहे. मदत कार्य पूर्ण झाल्यानंतर या अपघातात  एकूण मयत  व जखमी रुग्णांना बाबत माहिती समोर येणार आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने