शिरपूर तालुक्यातील बोराडी ते बोरपाणी रस्त्यावर बुडकी गावातुन बनावट दारू बनवण्यासाठी स्पिरिट ची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहितीवरून धुळे एलसीबीच्या पथकाने बुडकी गावातील चौफुलीवर सापळा रचून २ लाख २० हजार रुपये किमतीचे ११ प्लॅस्टिक ड्रममध्ये २ हजार २०० लिटर स्पीरीट जप्त करीत वाहनांसह दोघांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे.
तर एकूण पाच जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई तालुक्यातील बोराडी बोरपाणी रस्त्यावर बुडकी गावात धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली..गुरुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बुडकी गावात पिकअप वाहन क्रमांक एम. एच. ४८ टी ८१३३ हिस पथकाने अडवून तपासणी केली असता सदर वाहनात २ लाख २० हजार रुपये किमतीचे ११ प्लास्टिक द्रॅममधे २ हजार २०० लिटर स्पिरिट बनावट दारू बनविण्यासाठी वाहतूक करतांना आढळून आले.सदर कारवाईत पथकाने स्पिरिट साठा,मोबाईल व वाहन असा एकूण एकूण ५ लाख ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत अशोक मदन पावरा रा.टेम्बेपाडा,अक्षय लालसिंग पावरा, काबा उदेसिंग पावरा,हिंमत लालसिंग पावरा व दीपा पावरा सर्व राहणार बोराडी यांच्याविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक परविन कुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, योगेश राऊत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, मयुर पाटील, महेंद्र सपकाळ, संजय सुरसे यांनी केली आहे
Tags
news



