शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील हिंगोली बु. गावात नागरिकांचे 100% लसीकरण पूर्ण करण्यात आले असून तालुक्यातील हिंगणे बुद्रुक गाव आहे कोरोना मुक्त गाव म्हणून समोर आले आहे. या गावातील नागरिकांचे कोव्हीशिल्ड लसिकरण चे १००% लसिकरण यशस्वी करण्यात आले आहे याबाबत गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकार्यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
वाडी PHC अंतर्गत येणाऱ्या हिंगोणी बु गावात सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या कडुन मिळालेले वेळोवेळी लसिकरणांबद्दल सहकार्य व प्रबोधन मिळाल्यामुळे हिंगोणी बु गाव हे आज दि 8/10/2021 रोजी 7 वा कॅम्प घेवुन 100% लसिकरण व कोरोणामुक्त गाव झाले म्हणून गावकरी व ग्रामस्थ यांनी आभार प्रदर्शन केले आहे.
अशी माहिती हिंगोली बुद्रुक गावाचे ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील यांनी दिली आहे.
Tags
news



