शिरपुर-:दिनांक 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध संघटनांनी जाहीर केलेला भारत बंद आंदोलनाला शिरपूर तालुक्यातून किसान समन्वय समिती व इतर राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून सदरचे आंदोलन दिनांक 27 सप्टेंबर रोजी होणार असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे सदरचे आंदोलनाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे
दि 27 रोजी किसान समन्वय समिती शिरपुर तर्फै शिरपुर सकाळी शहरात ८/३० वापाचकंदीलजवळ आंदोलनकर्तै जमतील तेथे भारत बंद आंदोलनावर आप आपले विचार मांडतील ठिक ९/३० वाजता पाचकंदीलहुन रलीने घोषणा देत .प्रांत कार्यालयावर जा्ऊन निवेदन दीले जाईल.
ठिक ११ वाजता सांगवी गावाजवळ बोराडी फाट्याजवळ सर्व आदोंलनकर्ते जमतील व त्याठीकाणी किसान सघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी आदोंलनकर्तै भारत बंद आंदोलनाबाबत विचार मांडतील
त्यांनंतर ठीक १२ वाजता मुंबई आग्रा हायवे वर रस्ता रोको आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन दिले जाईल.
तरी शेतकरी,शेतमजुर,व कामगारांनी, छोटे व्यापारी,यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने हजर राहाण्याचे आव्हान. म.रा किसान सभा,राष्ट्रीय काँग्रेस ,राष्टवादी काग्रेस ,शिवसेना,भा.क.प प्रहार जनशक्ती पक्ष,सत्यशोधक जन आंदोलन,लाल बावटा शेतमजुर युनियन,.आदीवासी आघाडी,बिरसा फायर्टस,जागरण मंच इत्यादींनी केले आहे अशी माहिती
अँड हिरालाल परदेशी.
निमंत्रक किसान संघर्ष समन्वय समिती शिरपुर. यांनी दिली आहे
Tags
news
