सर एम.विश्वेश्वेरय्या आणि त्यांचं खान्देशशी असलेलं नातं....! ✍प्रवीण महाजन,पुणे




.आज 'अभियंता दिन(Engineers day)'.....भारतीय स्थापत्यशास्त्रातील महान अभियंते भारतरत्न एम.विश्वशैरय्या यांचा जन्मदिन......त्यानिमित्ताने.....✍


भारताचे एक महान सुपुत्र,भारतीय स्थापत्यशास्त्राचे जनक,पाणीपुरवठा योजनेचे शिल्पकार,उत्तम प्रशासक भारतरत्न सर एम.विश्वश्वेरय्या यांचा आज जन्मदिवस अखंड भारतभर 'अभियंता दिन'म्हणून साजरा केला जातोय....त्यानिमित्त सरांना विनम्र अभिवादन ! एव्हढया महान स्थापत्य अभियंता,कुशल प्रशासक,चित्रकार,औद्योगिक क्रांतीचे सल्लागार,लेखक साहित्यिक असणाऱ्या एम.विश्वेश्वरय्या हे अभियंता या मर्यादित संज्ञेत असूनसुद्धा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असू शकतात खरेतर विश्वास बसणार नाही...पंरतु एक इंजिनियर देशाच्या विकासासाठी स्वतःला कसा झोकून देऊ शकतो.? हे सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या जीवनपटावरून कळेल.ज्या वेळी भारतासमोर असंख्य आव्हाने होती, देश एका इंग्रज गुलामांच्या तावडीत होता अशावेळी एतद्देशीय तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या विकासात झोकून देणाऱ्या शास्त्रज्ञाची संख्या कमी आहे.आणि अशा वेळी आपल्या अंगभूत ज्ञानाने प्रचंड आव्हानावर मात करून स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा आणि नंतरही ज्यांनी देशासाठी झोकून दिले यापैकी सर विश्वश्वेरय्या यांचे नाव आदराने घ्यावे लागेल.सर एम.विश्वासैरय्या यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारने सरांचा 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला.या महान शास्त्रज्ञाचं आणि खान्देश भागाचं खूप जूनं नातं आहे.ते आपल्या खांदेशवासीयांना विसरून चालणार नाही.
      कर्नाटक राज्यातले सुपुत्र सणारे सर एम.विश्वसैरय्या यांना जास्त प्रेम दिलं असेल तर महाराष्ट्र राज्याने आणि अधिक धुळे जिल्ह्याने....कारण तब्बल 16 महिने ते धुळ्यात वास्तव्यास होते.....सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वयाच्या 23 व्या वर्षी सरांना पहिली पोस्टिंग मिळाली ती 1884 मध्ये धुळे येथे....  धुळे शहर ते देडरगाव तलाव पाईपलाईन, दातर्ती ता.साक्री येथील सायफन बंधारा, पांझरा नदीवरील १८८ फड बंधारे हे उपक्रम सर एम.विश्वेश्वरय्या यांचेच! धुळ्यातला PWD कार्यालयातल्या एका खोलीत ते बसत...आज धुळे येथे सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या नावाने 'एम.विश्वससैरय्या समिती'ने संग्रहालय उभारले आहे.यात संग्रहालयात स्थापत्यासशास्त्राचे उत्तम नमुने पाहायला मिळतात....सरांची मुंबई डिव्हिजन अंतर्गत पहिली पोस्टिंग नाशिक विभागात झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात पाणीपूरवठा योजनेचे काम सरांना देण्यात आले.पांझरा नदीवर दातर्ती ता.साक्री येथे शेती जलसिंचन प्रकल्पासाठी बंधारा बांधायचा होता. तसे ते काम आव्हानात्मक होते.प्रचंड पावसाळा असतांना विहित मुदतीत काम पार पाडण्यासाठी त्यावेळचे  तत्कालीन कार्यकारी अभियंता एच. जि.पालिसार यांनी सर एम.विश्वसरीय्या यांना दम भरला होता.'जर तुम्ही पावसाचे कारण सांगून विहित मुदतीत धरणाचे काम पूर्ण केले नाही तर तुमच्या अहवालावर कामचुकारपणाचा शेरा मारण्यात येईल' अशी तंबी देण्यात आली.चाकोरीबद्ध ठेकेदार आणि मजूर असणाऱ्या ब्रिटिश काळात एम.विश्वेश्वरय्या यांनी ते आव्हान स्वीकारले व 'सायफन' पद्धतीचा बंधारा बांधून विहित मुदतिच्या आतच ते काम पार पाडले.संपूर्ण देशात जलसिंचनासाठी जे सायफन पद्धतीचे बंधारे बांधले जातात त्याची देशभरात सर्वप्रथम सुरवात झाली असेल आणि केली असेल ती म्हणजे धुळे जिल्हयात सर विश्वेश्वरय्या सरांनी.... वेळेपूर्वीच काम पूर्ण केल्याने शिस्तभंगाच्या कारवाईसाठी आलेला इंग्रज अधिकारिसुद्धा सरांच्या कामावर खुश होऊन शाबासकी देऊन निघून गेला.त्यानंतर सरांना बढती दिली गेली.त्यादरम्यान धुळे शहर ते देडरगाव तलावापर्यन्तची पाणीपूरवठा योजना,पांझरा नदीवरील  'फड'बंधारे ही कामे सरांनी केली.नाशिक जिल्ह्यात असतांना नाशिक शहराला पाणीपूर्वठा करणाऱ्या योजनेचा आराखडा हा त्यांच्याच काळातला आराखडा आहे.धुळे व नाशिक जिल्हा हा त्या काळी मागास असलेला भाग होता.मलेरिया साथीचे प्रमाण जास्त असल्याने सरांनी शासनास बदली करण्याची विंनती केली.त्यानंतर त्यांना मुंबई डिव्हिजन अंतर्गत पुणे येथे नेमणूक दिली गेली.त्या कालावधीत खडकी कॅन्टोमेंट बोर्डाला पाणीपुरवठा करण्याची योजना त्यांनी विकसित केली.तेथेही 'सायफन'पद्धतीचे बंधारे नदीवर बांधून पाणी अडविण्यात आले व उन्हाळ्यात खडकी कॅन्टोमेंट बोर्डाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाउ लागला.जलसंपदेतील देदीप्यमान बांधकामामध्ये आटोमॅटिक गेटसह खडकवासला धरण,कावेरी नदीवरील कृष्णराज सागर धरण,भाटघर धरण,तुंगभद्रा नदीवरील धरण ही बांधकमेस सरांच्या अधिपत्याखाली झाली आहेत.म्हैसूर आणि वृंदावन गार्डन ही कलाकृती साकारण्यात सरांचाच वाटा आहे.सुरत व नन्तर म्हैसूर संस्थांनात सरांनी दिवाण म्हणून नोकरी सांभाळली. भ्रद्रावती कारखाना व त्याचे साहित्य भंगारात विकण्याचा सल्ला परदेशी उद्योजक एकेकाळी देत असतांना सर एम.विश्वेश्वरय्या यांनी ऐकले नाही व स्वमार्गदर्शनांने स्वदेशी कारागिरांच्या सहाय्याने कारखाना उभा राहिला.अवघ्या साडेपाच वर्षात कारखाना फायद्यात आणून देण्याचे काम त्यांनी केले.सन१९३७ साली सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष असतांना 'उद्योग विकास नीती' समितीत तांत्रिक सदस्य म्हणून सर एम.विश्वेश्वरेय्या यांची नेमणूक केली गेली.तेथे त्यांनी उत्कृष्ट संशोधन करून एकूण ३७ खंडात अहवाल प्रसिद्ध केला जो अहवाल नन्तर भारतीय नियोजन आयोगाने स्वीकारला.
         ब्रिटकाळीं आणि स्वातंत्रोत्तर कालखंडात अखंड भारताच्या विकासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेल्या सर एम.विश्वेश्वरय्या यांना भारत सरकांरने १९५५ साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.एक इंजिनिअर,उत्कृष्ट प्रशासक,उद्योग मार्गदर्शक,नियोजनकार असलेल्या सर एम.विश्वश्वरय्या यांनी त्यांचे अनुभव 'वर्क माय मेमरी' या लेखात लिहलेले असून धुळे ,नाशिक भागातील कामाचा लेखाजोखासुद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे.धुळे येथे 'सर एम.विश्वेसरय्या समितीमार्फत' सर एम.विश्वेश्वरय्या स्मृतीस्थळ उभारले असून त्यात सरांचा जीवनपट व इतर माहिती पहावयास मिळतो.आपण या स्मृतीस्थळाला नक्कीच भेट द्यायला हवी!

प्रवीण महाजन 
बांधकाम विभाग,पुणे
pravinpune123@gmail.com

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने