आदर्श आरोग्य सेविका कविता बोरसे यांच्या बदली निमीत्त निरोप समारंभ




शिंदखेडा तालुका भडणे येथील आरोग्य सेविका कविता बोरसे यांचि बदली निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम भडणे,येथील आरोग्य उपकेंद्रात संपन्न झाला शिंदखेडा तालुक्यातील विखरण आरोग्य उपकेंद्र अंतर्गत भडणे येथील उपकेंद्रातील आदर्श आरोग्य सेविका कविता बोरसे यांची शिरपूर येथील नगरपालिकेतील, दवाखान्यात बदली झाल्याने  आज भडणे,येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात,दवाखान्यात भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला दोन वर्षे गावाला उत्कृष्ट सेवा गावातील उत्कृष्ट लसीकरण, उत्कृष्ट नियोजन, तसेच त्यांची काम करण्याची उत्कृष्ट पद्धत,याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल ग्रामस्थ खूप समाधानी होते मात्र त्यांच्या शासनाच्या परिपत्रकानुसार शिरपूर येथील नगरपालिकेतील दवाखान्यात बदली झाल्याने त्यांच्या छोटासा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश भास्कर पाटील तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विखरण , येथील,डॉक्टर तडवी  आरोग्य सेविका कविता बोरसे यांची शिरपूर येथील नगरपालिकेत बदली झाल्याबद्दल त्यांचा भडणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात निरोप समारंभात पोलीस पाटील युवराज माळीयांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर तडवी तसेच भडणे ग्रामपंचायत सदस्य रामदास किशन मगळेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने