शिवसेना धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी हेमंत साळुंके यांची फेरनिवड धुळे जिल्हा युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिंदखेडा येथे सत्कार जिल्हा परिषद पोट निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिंदखेडा येथे शिवसेनेची बैठक




*शिंदखेडा ‍(प्रतिनिधी)* : धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये शिवसेनेचा झंझावात सुरु झाला आहे. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात व शिरपूर विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ना.उध्दवसाहेब ठाकरे यांचे कार्य पाहुन शिवसेना पक्षात येत्या चार महिन्यात अनेक क्षेत्रातील मान्यवर शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर पुन्हा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देऊन विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवून शिवसेना धुळे ग्रामीणमध्ये गावागावात पोहचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करु, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे दिली.
शिवसेनेच्या धुळे जिल्हा ग्रामीण संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज 21 सप्टेंबर रोजी बैठक झाली. सदरच्या बैठकीत जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद व पंचायत  समितीच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून नरडाणा जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समितीचे दाऊळ, हातनूर गण, साक्री तालुक्यातील बळसाणे गण, तसेच शिरपूर तालुक्यातील अजनाड पंचायत समिती गण येथील उमेदवार उपस्थित होते. यावेळी फेरनिवड झालेल्या जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांचा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तर युवासेनेचे जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी, जिल्हासमन्वयक गणेश परदेशी, उपजिल्हायुवाधिकारी अनिकेत बोरसे यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी हिलाल आण्णा माळी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. 
बैठकीस जिल्हासंघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरत राजपुत, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, शिरपूर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, शिरपूरचे उपजिल्हासंघटक विभाभाई जोगराणा, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, माजी जि.प.सदस्य छोटू पाटील, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप पवार, शिंदखेडा शहरप्रमुख संतोष देसले, एस.टी.कामगार सेनेचे आर.आर. पाटील, विनोद धनगर, माजी प.स.सदस्य दिपक पाटील, हिरालाल बोरसे, देवीचे सरपंच धनसिंग वसावे, शिरपूरचे शहरप्रमुख देवेंद्र पाटील, माजी शहरप्रमुख मनोज धनगर, अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाप्रमुख सद्दाम तेली, मसुद शेख, वाजिद मलक, नामदेव माळी, दिपक बोरसे, जितेंद्र राठोड, जितेंद्र पाटील, अभय भदाणे, नाना पहाडी, विशाल परदेशी, सुमित देशमुख, राजेंद्र माळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सुत्रसंचालन तालुका समन्वयक विनायक पवार यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने