पाणीपुरीवरून पतीसोबत वाद झाल्यानंतर पत्नीने केली आत्महत्या...... प्रतिनिधी दत्ता पारेकर



 
प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:कामावरून घरी येताना पतीने पत्नीला पाणीपुरी पार्सल घेऊन आला. 
मला न विचारता पाणीपुरी का आणली ?
 यावरून पत्नीने पतीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. 
त्या वादातून दोन दिवसानी पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील आंबेगाव पठार येथे घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 प्रतिक्षा सरवदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. 
प्रतिक्षा ही २३ वर्षांची होती. 
या प्रकरणामध्ये प्रतिक्षाचा पती गहिनाथ सरवदेला अटक करण्यात आलीय. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
३३ वर्षीय गहिनाथ आणि प्रतीक्षा यांचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला असून दोघेही उच्चशिक्षित आहेत. 
त्यांना एक मुलगा आहे. 
तर त्या दोघांमध्ये मागील दोन वर्षाच्या कालावधीत किरकोळ कारणामुळे सतत वाद होत रहायचे. 
असाच किरकोळ वाद मागील आठवड्यात दोघांमध्ये झाला. 
गहिनाथने कामावरून येताना पाणीपुरीचे पार्सल आणलं. 
मात्र मला न विचारता पाणीपुरी का आणली,
 यावरून प्रतीक्षाने पतीसोबत वाद घातला. 
या वादानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हता.
 या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. 
यातून प्रतीक्षाने  विषारी औषध प्यायले.
 त्यानंतर प्रतिक्षाला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.
 मात्र उपचारादरम्यान प्रतीक्षाचा मृत्यू झाला. 
 या प्रकरणी पती गहिनाथला अटक केली असून तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने