अ‍ॅपच्या तक्रार निवारण केंद्रावर सायबर चोरटय़ाचा क्रमांक, तक्रार नोंदविणाऱ्या युवकाला तीन लाखांचा गंडा....... प्रतिनिधी दत्ता पारेकर

अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ



प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 : अ‍ॅपद्वारे पैसे हस्तांतरित केल्याचा संदेश न आल्याने विचारणा करण्यासाठी  ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर संपर्क साधणाऱ्या एकाच्या खात्यातून चोरटय़ांनी तीन लाख रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
तक्रार निवारण केंद्राचा संपर्क क्रमांक बदलून चोरटय़ाने त्याचा क्रमांक टाकल्याची माहिती तपासात मिळाली आहे. 
याबाबत एका युवकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
तक्रारदार युवकाकडे दोन बँकांची क्रेडिट कार्ड आहेत. 
या दोन्ही कार्डची माहिती त्याने एका अ‍ॅपवर दिली होती. 
त्याद्वारे तक्रारदार युवक पैसे अदा करायचा. 
तक्रारदाराने त्याच्या खात्यात ८९ हजार रुपयांचा भरणा काही दिवसांपूर्वी केला होता. 
मात्र, त्याला कोणताही संदेश न आल्याने त्याने संबंधित अ‍ॅपच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर संपर्क साधला. 
चोरटय़ाने तक्रार निवारण केंद्रातील मोबाइल क्रमांक बदलून त्याचा क्रमांक टाकला होता. 
चोरटय़ाने तक्रार निवारण करण्याच्या बहाण्याने युवकाकडून बँक खात्याची माहिती घेतली. 
चोरटय़ाने अ‍ॅप वापराबाबत भरलेली गोपनीय माहितीही घेतली. 
त्यानंतर चोरटय़ाने युवकाचा मोबाइल संच, ई-मेल हॅक केला. 
मोबाइल संच बँक खात्याला जोडण्यात आलेला होता. 
चोरटय़ाने युवकाच्या खात्यातून तीन लाख १९ हजार ८९६ रुपये लांबविले. 
पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने