शिरपूर प्रतिनिधी - मागील आठवड्यात राज्यभरात गणेशोत्सव घराघरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला तसाच शिरपूर शहरात देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला. भक्तीभावाने घराघरात गणेशाची मूर्ती स्थापन करून ती मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याची परंपरा आहे .मात्र कालांतराने यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असून नदीपात्रात देखील कचरा वाचत असतो शहरातील अरुणावती नदी वर दोन ते तीन बंधारे असल्यामुळे नदीला पाण्याची फारसा मोठा प्रवाह देखील नाही आणि नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे नदीपात्रात घाण व कचरा साचत असून आपण विसर्जित केलेल्या मुर्त्यांची देखील कळत नकळत विटंबना होत असते या बाबतीत जागृत असलेल्या शिरपूर शहरातील पाटील वाडा मित्र मंडळाने व छावा संघटना यांनी संयुक्तपणे एक मोहीम राबवून नागरिकांना जागृत केले व समाज उपयोगी उपक्रम राबवला सदरच्या मंडळाने चला आपल्या लाडक्या बाप्पाला खंडित होण्यापासून वाचवूया हा उपक्रम हाती घेऊन गणपती बाप्पाची अवहेलना टाळण्यासाठी अरुणावती नदीतील बाप्पाच्या सर्व मुर्ती गोळा करून तापी नदी पात्रात धार्मिक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन केले. यावेळेस पाटील वाडा मित्र मंडळ व छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य यांनी मिळून हा उपक्रम राबवला त्यासाठी नगरसेवक हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत व मार्गदर्शन केले.
Tags
news

