अक्कलकुवा प्रतिनिधी केवल सिंह राजपूत सर
अक्कलकुवा - पंचायत समितीचे उपसभापती इंद्रपाल सिंग शंकरसिंह राणा यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन दिले असून यात अक्कलकुवा शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याबाबत अवगत केले आहे. सदरच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की अक्कलकुवा शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे याबाबत माहिती घेतली असता विद्युत वितरण कंपनी यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या वीज पुरवठा खंडित केल्याने गावात लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने या प्रकरणात दखल घेऊन तात्काळ हा प्रश्न निकाली काढावा अशी विनंती करण्यात आली असून याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे
Tags
news
