शिरपूर कंपनीस स्फोटतील बाधितांना न्याय द्या ,अथवा आंदोलन - उदयनराजे जाधव



शिरपूर प्रतिनिधी  - शिरपूर तालुक्यात 2 वर्षांपूर्वी वाघाडी येथील रुमित  केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटातील गंभीर जखमी झालेल्या व इतर कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत मदत मिळाली नसून त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि म्हणून त्यांना त्वरित मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे जाधव यांनी तहसीलदार शिरपूर यांना निवेदन दिले आहे,.
 यात त्यांनी सदर स्फोट मध्ये 14 लोक मयत झाले असून 20 लोक गंभीर जखमी झाले होते यातील सर्व जखमी व इतर बाधित लोकांना कंपनीने मदतीचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत त्यांना कोणतीही मदत प्राप्त न झाल्याने सदर कुटुंबांचे हाल होत असून ते हलाखीचे जीवन जगत आहेत त्यामुळे सदर लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मा. तहसीलदार यांनी कंपनी अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावे .यापूर्वीच कंपनी अधिकाऱ्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समोर व शासनाने नेमलेल्या कमिटी समोर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र सर्वांनीच या बाधितांना वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे म्हणून म. तहसीलदार यांनी या पत्राची दखल घेत गरजूंना न्याय मिळवून द्यावा अन्यथा बाधित कुटुंबांना घेऊन 15 दिवसानंतर तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने