दोंडाईचा येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल ला नीट परीक्षेची केंद्र सरकारची मान्यता



शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल ला नीट परीक्षेत मान्यता केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती अहिंसा इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष राजेश मुनोत यांनी गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दिली आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 12 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या प्रवेश परीक्षेचे केंद्र म्हणून दोंडाईचा येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल ला केंद्र सरकारने मान्यता दिली असून यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. 

नीट परीक्षा केंद्रासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सुसज्ज खोल्या व सर्व प्रकारच्या शालेय सोयींची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या सर्व निकषात अहिंसा इंटरनॅशनल स्कूल सक्षम असल्याने केंद्र सरकारच्या वतीने नीट परीक्षा केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने