ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी! जिल्हाधिकारी जलज शर्मा : अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सनियंत्रण समितीची बैठक

 



 

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी काळातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुध्द दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत. त्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करून परवाना नोंदणीसाठी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, असोसिएश्न कॉमर्सचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, गोकुळ बधान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, आगामी काळात सण, उत्सव येत आहेत. अशा वेळी बाजारात भेसळयुक्त माल येवू शकतो. अशा परिस्थितीत ग्राहकांमध्ये जागरुकता आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी. अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या परवाना नोंदणीसाठी व्यापकस्तरावर अभियान राबवावे.

सहाय्यक आयुक्त श्री. कांबळे यांनी सांगितले, गेल्या वर्षी 57 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेच्या माध्यमातून अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर करण्यात येईल.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने